मोठी बातमी IMD चा राज्यात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा अंदाज..!

 

IMD Rain Alert Today: नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यामध्ये आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे व राज्यांमध्ये सध्या वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस पडत आहे व अशातच भारतीय हवामान खात्याने आता पुन्हा एक नवीन हवामान अंदाज वर्तविला आहे या अंदाजानुसार पुढील तीन दिवस राज्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. याविषयी आज आपण सविस्तर माहिती या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

 

पुढील 3 दिवस धोक्याचे! IMD कडून यलो अलर्ट जारी हवामान विभागाने पावसासंर्भात महत्वाची अपडेट्स दिली आहे. महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे.  

 

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, संभाजीनगर, जालना या भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. 

 

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

 

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या 5 नोव्हेंबरपासून थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

 

👉🏻महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻

Leave a Comment

Close Visit agrinews